Ad will apear here
Next
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काशिनाथ भातगुणकीसोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कुठल्या प्रकाशनाची पुस्तके वापरावी, वेळेचे नियोजन कसे करावे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा व त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण व त्यासाठी लागणारे गुण आदी विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले; तसेच ‘विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून भारतासमोरील सध्या असणाऱ्या प्रश्नांची उकल करावी,’ असे त्यांनी सांगितले.

भातगुणकी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौघुले, प्राचार्य डॉ. ए. एस. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. टी. डी. मसलेकर, प्रा. एस. एम. बिराजदार, प्रा. पी. आर. हेडगिरी यांसह विद्यार्थी उपस्थित होते. 

अनिरुद्ध कट्टा यांनी सूत्रसंचालन केले. गौरी मुटकुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (एसेस) प्रा. ए. जी. चव्हाण, संजय जाधव यांनी मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUDBG
Similar Posts
पर्यावरणदिनानिमित्त सायकल रॅली सोलापूर :   ड्रीम फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने पर्यावरण जागर सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश त्यातून देण्यात आला. यशवंतराव चव्हाण पुतळा ते स्मृती उद्यान या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या
‘स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी महत्वाची’ सोलापूर :   विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ‘ड्रीम फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले रविराज कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. ‘ड्रीम आयएएस सेंटर’ येथे दोन जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेतील यशाचा कानमंत्र रविराज यांनी दिला
शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार समारंभ सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या 'ड्रीम आयएएस सेंटर'तर्फे दोन सप्टेंबर रोजी 'डॉ. कलाम टीचर इन्स्पायर अॅवॉर्ड २०१७' देण्यात येणार आहे. खासदार बसवराज पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. शिवरत्न शेटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. महापौर
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language